आयुधनिर्माणी चांदा येथे आयुध निर्माणी दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 00:31 IST2017-03-20T00:31:50+5:302017-03-20T00:31:50+5:30

आयुध निर्माणी चांदा येथे आयुध निर्माणी दिवसानिमित्त दोन दिवसांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आले होते.

Ordnance Factory Day celebrated at the Ordinator Chanda | आयुधनिर्माणी चांदा येथे आयुध निर्माणी दिवस साजरा

आयुधनिर्माणी चांदा येथे आयुध निर्माणी दिवस साजरा

विविध कार्यक्रमाचे आयोजन : आयुध प्रदर्शन
भद्रावती : आयुध निर्माणी चांदा येथे आयुध निर्माणी दिवसानिमित्त दोन दिवसांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आले होते.
पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमातील आयुध प्रदर्शनाचे उद्घाटन महिला कल्याण समितीच्या अध्यक्षा सुनीता सोनपिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनीत विविध रॉकेट्स, बॉम्ब, शेल्स माईन्स (भुसुरुंग), रणगाडा भैदी (टँक) अमुनीशन्स, ग्रेनेडस, पिनाका इत्यादी उत्पादकांची प्रदर्शनी लावण्यात आली होती. तसेच आयुध उत्पादकाची चित्रफीत आणि छायाचित्र प्रदर्शनीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ महाप्रबंधक हि.कि. सोनपिपरे, संजीव गुप्ता, वसंत निमजे, डी. बॅनर्जी, कृष्णमुर्ती आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर दुसऱ्या दिवशी आयुधनिर्माणी कर्मचारी अधिकारी यांचे मनोरंजनासाठी दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रद्वारे विविध राज्यातील लोकनृत्य तर हास्य कवी संमेलनाचे आयोजन केले होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Ordnance Factory Day celebrated at the Ordinator Chanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.