गावातील सुव्यवस्था धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:33 IST2021-09-24T04:33:32+5:302021-09-24T04:33:32+5:30
वाहतूक पोलिसांचे होतेय दुर्लक्ष चंद्रपूर : येथील रामनगर चौकापासून तर बिनबागेट मार्गे मोठ्या प्रमाणात जड वाहने नेली जात आहे. ...

गावातील सुव्यवस्था धोक्यात
वाहतूक पोलिसांचे होतेय दुर्लक्ष
चंद्रपूर : येथील रामनगर चौकापासून तर बिनबागेट मार्गे मोठ्या प्रमाणात जड वाहने नेली जात आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. इतर वाहनांमुळे जड वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत वाहन चालवावे लागते. वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन जड वाहनांवर बंदी घालावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अल्पवयीन वाहनधारक बेभान
चंद्रपूर : स्पर्धात्मक युगात अल्पवयीन मुले मोटरसायकलवर स्वार होऊन सुसाट वेगाने दुचाकी चालवितात. त्यामुळे अपघात होत आहेत. शहरातील वर्दळीच्या मुख्य मार्गावर भरधाव वेगाने वाहन चालविली जातात. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ठाण्यातील जागा मोकळा करावी
चंद्रपूर : येथील रामनगर आणि शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेली वाहने लिलाव अभावी तशीच पडून आहे. यातील काही वाहने निकामी झाली असून, त्याचे स्पेअर पार्ट ही बेपत्ता झाले आहे. या वाहनांचा लिलाव करण्याची मागणी आहे. यामुळे पोलीस स्टेशन परिसरातील जागा मोकळी होईल.
शहरातील बागांचा विकास करावा
चंद्रपूर : चंद्रपुरातील वस्त्यांमध्ये प्रशासनाने बागेसाठी जागा आरक्षित केल्या आहेत. ज्या ठिकाणी बाग आहे, त्या बागेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या बागांचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रवाशी निवारा निरुपयोगी
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावांतील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना पावसात भिजत उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. बहुतेकदा प्रवासी झाडांच्या सावलीचा आधार घेतात. विशेषतः राजुरा, कोपना तालुक्यातील प्रवाशी निवारे दुर्लक्षित झाले आहे .
डासांचा प्रादुर्भाव वाढला
चंद्रपूर : शहरात काही ठिकाणाहून कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नाही. कचरा वेचक दोन ते तीन दिसत येत नसल्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचा वावर वाढला असून शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
बंद सिग्नल, अपघाताला आमंत्रण
चंद्रपूर : येथील मिलन चौक, ट्रायस्टार हाॅटेल तसेच काही चौकांतील ट्राफिक सिग्नल मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे सिग्नल सुुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.सिग्नल बंद असल्यामुळे अनेक वेळा अपघातही होत आहे.
नागरिक सवलतींपासून वंचित
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावातील नागरिकांना अद्याप आधारकार्ड नाही. त्यामुळे त्यांना विविध सोई सवलतींपासून वंचित रहावे लागत आहे. आता सर्व शासकीय कामात आधारकार्ड सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे गावागावात कॅम्प लावण्याची मागणी करण्यात आली आली.
विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता
चंद्रपूर : पोलीस किंवा आर्मी भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जाण्याची इच्छा असते. अशी मुले एनसीसीमध्ये सहभागी होतात. काही जण आठवी पासून तर काही जण अकरावीपासून एनसीसीची निवड करतात. मात्र बहुतेक शाळा, महाविद्यालयात एनसीसीची परेड होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होत असून, भविष्याची त्यांना चिंता सतावत आहे.
नदीवरील पुलाला कठडे लावा
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही नद्यांच्या पुलावरील कठडे तुटले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावरील पुलाच्या कठड्यांचे त्वरित बांधकाम करावे, अशी मागणी केली जात आहे.