आदेश बांदेकर यांनी घेतले वरदविनायकाचे दर्शन
By Admin | Updated: September 15, 2015 03:19 IST2015-09-15T03:19:47+5:302015-09-15T03:19:47+5:30
शिवसेनेचे राज्य सचिव तथा प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांचे शुक्रवारी भद्रावती येथील बाळासाहेब ठाकरे

आदेश बांदेकर यांनी घेतले वरदविनायकाचे दर्शन
भद्रावती : शिवसेनेचे राज्य सचिव तथा प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांचे शुक्रवारी भद्रावती येथील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ शिवसेनेतर्फे स्वागत करण्यात आले. पर्यटन नगरीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे त्यांनी याप्रसंगी कौतुक केले.
विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक येथील गवराळा परिसरातील प्राचिन वरदविनायक गणेश मंदिरात जावून त्यांनी दर्शन घेतले तसेच आरती व पूजा केली. त्यानंतर मंदिराविषयीचा इतिहास जाणून घेतला. वरदविनायकाच्या मंदिराला लाभलेल्या निसर्गरम्य दृश्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर नगर परिषदेने बांधलेल्या धर्मशाळेला त्यांनी भेट दिली. याप्रसंगी आदेश बांदेकर यांच्यासमवेत आमदार बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, शिवसेनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते व नगरसेवक उपस्थित होते. नगरपरिषद भद्रावती येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाचे आमंत्रण आमदार बाळू धानोरकर व नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी आदेश बांदेकर यांना दिले असता, कार्यक्रमासाठी पुन्हा भद्रावतीला येण्याचे त्यांनी आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)