चंद्रपुरातील ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:07+5:302021-04-25T04:28:07+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. व मृत्यूचा दरसुद्धा झपाट्याने वाढत आहे. रेमडेसिविरच्या अल्प प्रमाणातील पुरवठा ...

चंद्रपुरातील ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करा
चंद्रपूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. व मृत्यूचा दरसुद्धा झपाट्याने वाढत आहे. रेमडेसिविरच्या अल्प प्रमाणातील पुरवठा व ऑक्सिजन सिलिंडरचा अभाव यामुळे मृत्यूची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. या स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यात अल्प प्रमाणात होत असलेला ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणे महत्त्वाचे आहे. यासाठी चंद्रपूर शहरात स्थापित असलेल्या मेडिकल कॉलेज व सिव्हिल हॉस्पिटल येथे उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करा, अशी मागणी जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
उपयुक्त लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यास शहरात ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा कार्यन्वित होईल व त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णालयात उपयुक्त ऑक्सिजन सिलिंडरचा योग्य पुरवठा करण्यास सोयीचे होईल. यामुळे ऑक्सिजनअभावी मृत्यूचे प्रमाणही कमी होईल.
चंद्रपुरात ऑक्सिजन निर्मिती प्लांट असल्यावर कार्यान्वित नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे ऑक्सिजन तयार करण्यास लागणाऱ्या लिक्विडचा तत्काळ पुरवठा करून ऑक्सिजन प्लांटला कार्यान्वित करावे, अशी मागणी पाझारे यांच्यासह भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारणे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.