शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा पर्यटकांच्या सेवेत खुली बस दाखल

By admin | Updated: March 4, 2015 01:29 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पतील वनभ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेत खुली बस आली आहे.

पुन्हा तीन बसेस येणार : टायगर फाऊंडेशन कंझर्व्हेशनचा पुढाकारचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पतील वनभ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेत खुली बस आली आहे. डेक्कन ओडीसीमधून ताडोबा अभयारण्याच्या पर्यटनासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या सेवेसोबतच ती वर्षभर अन्य पर्यटकांनाही सेवा देणार आहे.मागील अनेक दिवसांपासून ताडोबा अभयारण्यात खुली पर्यटन बस सुरू करण्याची मागणी विचाराधिन होती. यावेळी ती पूर्ण झाली आहे. टायगर कंझर्व्हेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून या बसेसच्या खरेदीसाठी निधी मिळाला आहे. २२ पर्यटक एकाच वेळी वन भ्रमंती करू शकतील, अशी व्यवस्था आहे. या बसेस खास तयार करून घेण्यात आल्याने सुरक्षेची पूर्णत: काळजी घेण्यात आली आहे. ती नव्याने बनवून घेण्यात आली असून आवश्यक त्या सुधारणही करून घेण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी साडेतीनशे ते चारशे रूपये प्रति व्यक्ती प्रति फेरी शुल्क आकारला जाणार आहे. यात वेगळे प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही, यामुळे सर्वसामान्य पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी वनविभागाला आशा आहे. मोहर्ली गेटवरून दररोज ही फेरी सोडली जाणार आहे. ताडोबा पर्यटनासाठी महिन्यातून एकदा डेक्कन ओडीसीतून येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या पर्यटनासाठी ती प्राधान्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर अन्य दिवशी ती सर्व पर्यटकांच्या सेवेत असणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची गर्दी आणि मागणी लक्षात घेता येथील पर्यटन पुन्हा विकसित करण्यासाठी चार खुल्या बसेसची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी २ मार्चला एक बस आली आहे. या आठवड्यात परिवहन विभागाकडून सोपस्कर पार पडल्यावर ती चारपाच दिवसातच पर्यटकांच्या सेवेत रूजू होईल.- जी.पी. गरड, क्षेत्रीय संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प