शेगाव आरोग्य केंद्रात दोन वेळात ओपीडी

By Admin | Updated: December 15, 2014 22:53 IST2014-12-15T22:53:25+5:302014-12-15T22:53:25+5:30

तालुक्यातील शेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी कित्येक वर्षापासून होती, ही मागणी मंजुर झाली. परंतु बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) दिवसात एकच वेळ घेण्यात येत होती.

OPD in two years at Shegaon Health Center | शेगाव आरोग्य केंद्रात दोन वेळात ओपीडी

शेगाव आरोग्य केंद्रात दोन वेळात ओपीडी

आरोग्य मंत्र्याचे आदेश : यंत्रणा कामाला लागली
वरोरा : तालुक्यातील शेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी कित्येक वर्षापासून होती, ही मागणी मंजुर झाली. परंतु बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) दिवसात एकच वेळ घेण्यात येत होती. त्यामुळे नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत होता. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत होईल तेव्हा होईल, परंतु येत्या आठ दिवसात सोपस्कर पूर्ण करून शेगाव आरोग्य केंद्रात दोन्ही वेळची ओपीडी सुरू करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी वरोरा दौऱ्यावर असताना आरोग्य विभागास दिले आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव गावामध्ये मोठी बाजारपेठ असुन २० ते २५ गावाचा शेगाव गावाशी नेहमी संपर्क येतो. नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून नागरीक करीत होते. वाढती लोकसंख्या व आजारामुळे तसेच वरोरा-चिमूर मार्गावरील अपघातग्रस्तांना सेवा आरोग्य यंत्रणा अपुरी पडत होती. परिणामी जखमींना नाहक त्रास करावा लागत होता.
शेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाने मंजुरी देत इमारत बांधकामालाही मंजुरी दिली आहे. नव्याने होणाऱ्या प्राथमिक स्वास्थ केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याचे १७ पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे या आरोग्य उपकेंद्रात एकच वेळ ओपीडी घेण्यात येत असल्याने बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याची बाब आमदार बाळू धानोरकर यांनी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या निदर्शनास वरोरा भेटीदरम्यान आणून दिली. त्यावेळी तातडीने सोपस्कर पूर्ण करून येत्या आठ दिवसात शेगाव येथे दोन्ही वेळ ओपीडी घेण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहे. यासोबतच इमारतीचे बांधकाम व वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: OPD in two years at Shegaon Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.