फक्त अडीच हजार डोसेस शिल्लक, नागरिक वेटिंगवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:55+5:302021-04-02T04:29:55+5:30

कोरोना प्रतिबंधासाठी ६० वर्षे तसेच ४५ वर्षांवरील सहव्याधी व्यक्तींना लस घेताना अडचणी येऊ नये, याकरिता जिल्ह्यात ९१ केंद्र सुरू ...

Only two and a half thousand doses left, on citizen waiting! | फक्त अडीच हजार डोसेस शिल्लक, नागरिक वेटिंगवर !

फक्त अडीच हजार डोसेस शिल्लक, नागरिक वेटिंगवर !

कोरोना प्रतिबंधासाठी ६० वर्षे तसेच ४५ वर्षांवरील सहव्याधी व्यक्तींना लस घेताना अडचणी येऊ नये, याकरिता जिल्ह्यात ९१ केंद्र सुरू आहेत. यातील ७० शासकीय व सहा खासगी आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे सध्या कोविशिल्ड लसीचे सुमारे अडीच हजार डोस उपलब्ध आहेत.

पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी कोव्हिशिल्ड’ लस पाठविण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील मागणीनुसार, कोव्हॅक्सिन लसीचे ४ हजार ८०० डोस जिल्ह्याला मिळाले. ३१ मार्चपर्यंत ही लस २३६ जणांना टोचण्यात आली. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात हेल्थ केअर वर्कर, फ्रन्टलाइन, ६० वर्षांवरील व सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील एक लाख १० हजार १७२ जणांनी लस घेतली. सर्व वयोगटांतील पात्र नागरिकांच्या संख्येनुसार जिल्ह्याला १४ लाख ८० हजार डोसेसची आवश्यकता आहे.

एक लाख १७ हजार डोसेसची मागणी

नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. मात्र, मात्र, पुरेसा लससाठा उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने एक लाख १७ हजार डोसेची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.

११ हजार ३४ जणांनी घेतली लस

कोणती व्याधी नसणाऱ्या ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे आजपासून लसीकरण सुरू झाले. आरोग्य विभागाने रात्री ८ वाजता दिलेल्या माहितीनुसार ११ हजार ३४ जणांनी लस घेतली. बऱ्याच नागरिकांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. परंतु, पुरेशा डोसेसअभावी वेटिंगवर राहावे लागणार आहे.

कोट

लसीची मागणी नोंदविण्यात आली. सध्या काही केंद्रांमध्ये १५० ते २०० डोसेस उपलब्ध आहेत. लस उपलब्ध झाली नाही तर असे केंद्र तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.

-डॉ. प्रकाश साठे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर

तालुकानिहाय लसीकरण ३१ (मार्चपर्यंत)

राजुरा ५५३८

वरोरा ८१०९

ब्रह्मपुरी १०३४९

भद्रावती ७९१३

चिमूर ४८८३

मूल ७३८१

सिंदेवाही ८२८१

चंद्रपूर ग्रामीण ६७८३

बल्लारपूर ४८६४

कोरपना ५४६०

सावली ४७७६

गोंडपिपरी ३५२७

नागभीड ५४५०

जिवती १८७७

पोंभुर्णा ३४०५

चंद्रपूर शहर २५४१७

Web Title: Only two and a half thousand doses left, on citizen waiting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.