महाराष्ट्राचे नुसते खांब, वीज पुरवठा मात्र आंध्रातून

By Admin | Updated: February 7, 2015 00:29 IST2015-02-07T00:29:02+5:302015-02-07T00:29:02+5:30

महाराष्ट्र-आंध्र प्रदेश सीमेवरील वादग्रस्त चौदा गावांत अनेक समस्या आजही जैसे थे आहेत. एकमेकांकडे बोट दाखवणारे हे दोन्ही राज्य या गावांच्या विकासाची हमी अजूनही घेतलेली नाही.

Only the pillars of Maharashtra, but the electricity supply from Andhra, | महाराष्ट्राचे नुसते खांब, वीज पुरवठा मात्र आंध्रातून

महाराष्ट्राचे नुसते खांब, वीज पुरवठा मात्र आंध्रातून

संघरक्षित तावाडे  जिवती
महाराष्ट्र-आंध्र प्रदेश सीमेवरील वादग्रस्त चौदा गावांत अनेक समस्या आजही जैसे थे आहेत. एकमेकांकडे बोट दाखवणारे हे दोन्ही राज्य या गावांच्या विकासाची हमी अजूनही घेतलेली नाही. काही सोयी महाराष्ट्र शासन तर काही सुविधा आंध्र शासन देत आहे. असे कुठपर्यंत चालणार असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
सीमेवरील चौदा गावांसाठी पूर्वीपासूनच आंध्राचे स्वस्त धान्य रेशन कार्ड होते. पण आंध्र प्रदेश मधून तेलंगाणा राज्य वेगळे झाल्यामुळे हे चौदा गाव तेलंगाणा राज्यात आले आहेत. त्यामुळे तेलंगाणा राज्याकडून या गावातील प्रत्येक कुटुंबाला नवीन रेशन कार्ड मिळाले आहेत. एक रुपया प्रति किलो तांदूळ, तेही एका व्यक्तीला सहा किलो एवढे स्वस्त धान्य या राज्याकडून मिळणार आहे.
वीजेच्या बाबतीत महाराष्ट्राकडून अजूनही काही गावांत वीज पोहचलीच नाही. केवळ विजेचे खांबच गेल्या तीन वर्षापासून येथे उभे आहेत. भोलापठार, लेंडीगुडा, पद्मावती इंदिरानगर, येसापूर , अंतापूर, कामतगुडा, नारायनगुडा या गावात आंध्राची वीज प्रकाश देत असताना या प्रकाशात महाराष्ट्राचे खांब उभे राहून काय काम, असा प्रश्न नागरिक करत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून तेलंगाना राज्यातून वीज पुरवठा बंद आहे. गावात अंधार आहे. पण याकडे ना तेलंगानाचे लक्ष ना महाराष्ट्र राज्याचे लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Only the pillars of Maharashtra, but the electricity supply from Andhra,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.