नामांकनासाठी केवळ एकच दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:20 IST2019-03-23T22:19:31+5:302019-03-23T22:20:20+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची सुरुवात सोमवारपासून झाली. मात्र आतापर्यंत केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख आहे. मात्र रविवारी सुटीचा दिवस असल्याने या दिवशी उमेदवारांना नामांकन दाखल करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ सोमवार हा एकच दिवस शिल्लक आहे. या दिवशी उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळणार आहे.

नामांकनासाठी केवळ एकच दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची सुरुवात सोमवारपासून झाली. मात्र आतापर्यंत केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख आहे. मात्र रविवारी सुटीचा दिवस असल्याने या दिवशी उमेदवारांना नामांकन दाखल करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ सोमवार हा एकच दिवस शिल्लक आहे. या दिवशी उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळणार आहे.
मतदान प्रक्रिया १८ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. १८ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले. दरम्यान, सहा दिवसात केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीकडून एक व बहुजन वंचित आघाडीकडून एक, अशा दोन अर्जांचा समावेश आहे. यासोबत आतापर्यंत ९९ नामांकन अर्ज प्राप्त केल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या कक्षालगत असणाºया २० कलमी सभागृहामध्ये अर्जाची प्राथमिक तपासणी करण्यात येईल व त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या कक्षामध्ये सदर अर्ज दाखल करता येईल.
अर्ज दाखल करण्यासाठी २५ हजार रुपये अनामत रक्कम आवश्यक असून अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी ही रक्कम १२ हजार ५०० रुपये आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मदत कक्षातून हा अर्ज उपलब्ध करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करताना उमेदवारांसोबत चारच व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांची होणार दमछाक
२५ मार्च हा एकमेव दिवस अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना मिळणार असल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. अर्जाची प्राथमिक छाननी, अनामत रक्कम स्वीकारणे आणि नंतर अर्ज दाखल करणे या प्रक्रियेस काही कालावधी लागत असल्याने यंत्रणाही सज्ज झाली असली तरी कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. यासाठी सोमवारी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांसाठी सुटी; मात्र कामे सुरूच
शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस असल्याने इच्छुक उमेदवार व उमेदवारांच्या समर्थकांना या दोन दिवसात उमेदवारी अर्ज प्राप्त करणे व दाखल करण्यास मज्जाव होता. मात्र निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाºयांना मात्र शनिवार आणि रविवारी सुटी नाही. त्यामुळे कर्मचाºयांना शनिवारी कर्तव्यावर रुजू व्हावे लागले. रविवारीही कर्मचाºयांना निवडणूकसंबंधातील कामे करावी लागणार आहे.