शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

फक्त चार हजार 800 डोस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 5:00 AM

आरोग्यसेवक, कोरोना योद्धा, ४५ वर्षांवरील सर्व व ६० वर्षांवरील नागरिकांचे वेगाने लसीकरण सुरू झाले. लस घेण्यात अडचणी येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने ९१ केंद्र तयार केले. चंद्रपूर महानगर पालिका आरोग्य विभागाने १४ केंद्रांवरून लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली. मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे एक लाख १७ हजार डोसची मागणी केली.

ठळक मुद्देजिल्ह्यात लसटंचाई : सर्वच लसीकरण केंद्र बंद ठेवाव्या लागणार?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांकडून आता मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, गुरूवारी जिल्ह्यात केवळ चार हजार ८०० डोस शिल्लक आहेत. केंद्र सरकारकडून लस उपलब्ध झाले नाही तर शुक्रवारपासून लसीकरण बंद ठेवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येणार आहे.आरोग्यसेवक, कोरोना योद्धा, ४५ वर्षांवरील सर्व व ६० वर्षांवरील नागरिकांचे वेगाने लसीकरण सुरू झाले. लस घेण्यात अडचणी येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने ९१ केंद्र तयार केले. चंद्रपूर महानगर पालिका आरोग्य विभागाने १४ केंद्रांवरून लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली. मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे एक लाख १७ हजार डोसची मागणी केली. मात्र, जिल्ह्यातील सर्व केंद्रांसाठी कोविशिल्डचे केवळ ३५ हजार ४० हजार डोस मिळाले. त्यामुळे डोस वितरण करताना प्रशासनाची दमछाक झाली. लस घेण्यासाठी आता नागरिकांकडून प्रतिसाद मिळू लागल्याने गुरूवारी जिल्ह्यात केवळ चार हजार ८०० डोस शिल्लक राहिले.  शुक्रवारी डोस उपलब्ध झाले नाही तर जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवाव्या लागणार आहे.

नऊ केंद्रांवरून नागरिक परतलेबल्लारपूर : तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिक प्रतिबंधक लस लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, गुरूवारी तालुक्यातील नऊ केंद्रांवरून नागरिकांना परत जावे लागले. केवळ बामणी येथील आरोग्य केंद्रात  ४० जणांना लस देण्यात आली. शहरातील ग्रामीण रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, रेल्वे इन्स्टिट्युट, नाट्यगृह, बल्लारपूर मेडिकल असोसिएशन, वेकोलि रूग्णालयात लसीकरण केंद्र सुरू झाले. गुरूवारी सकाळी नागरिक केंद्रात गेले असता लस उपलब्ध नसल्याचा पलक दिसला. बामणी कोठारी, विसापूर येथेही लसीकरण झाले नाही.

कर्तव्यात हयगय केल्यास कारवाईकोरोना प्रतिबंधक औषधसाठा, मनुष्यबळ, अन्य सुविधांसाठी तात्काळ मागणी केल्यास जिल्हा प्रशासनाद्वारे पूर्तता केल्या जाईल. मात्र, कर्तव्यात कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सिजन बेड, प्रतिबंधित क्षेत्र, ब्रेक द चेनअंतर्गत सूचनांचे पालन, आरटीपीसीआर चाचण्या व लसीकरणाबाबतही                    संबंधितांना निर्देश दिले.

भद्रावती,  राजुरातही तुटवडाभद्रावती, ब्रह्मपुरी, राजुरा तालुक्यात काहींनी को-विन अ‍ॅपवर तर बऱ्याच जणांनी ऑफलाईन नोंदणी केली. मात्र, पुरेसे डोस उपलब्ध नसल्याने परत जावे लागल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस