कोरोनाची लस घेतलेल्या डॉक्टरलाच कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:52 IST2021-02-18T04:52:43+5:302021-02-18T04:52:43+5:30

चंदनखेडा : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी संतोष झाडे यांना कोरोना लस घेतल्यानंतर ११ दिवसांनी ...

Only a doctor who has been vaccinated against coronavirus can be infected | कोरोनाची लस घेतलेल्या डॉक्टरलाच कोरोनाची लागण

कोरोनाची लस घेतलेल्या डॉक्टरलाच कोरोनाची लागण

चंदनखेडा : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी संतोष झाडे यांना कोरोना लस घेतल्यानंतर ११ दिवसांनी कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असली तरी लस घेणाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. कोरोना लसीकरणानंतर आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन न करण्यामुळे असा प्रकार घडला, असे आरोग्य विभागाचेच म्हणणे आहे. डॉ. संतोष झाडे यांनी ६ फेब्रुवारीला कोरोनाची लस घेतली. त्यानंतर त्यांचे दैनंदिन कामे नेहमीप्रमाणे सुरू होते. परंतु काही दिवसानंतर त्यांना ताप आला. सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसून आली. मंगळवारी कोरोना चाचणी करण्यात आली. बुधवारी त्यांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चंदनखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र तीन दिवसांसाठी सील करण्यात आला असून त्यातील इतर कर्मचारी, अधिकारी यांना अलगीकरण करण्यात आले आहे. त्यांचीसुद्धा कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

कोट

६ फेब्रुवारी रोजी मी कोरोनाची लस घेतली. परंतु माझी प्रकृती बरी नसल्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. आज बुधवारी चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

-डॉ. संतोष झाडे, वैद्यकीय अधिकारी चंदनखेडा.

कोट

कोरोनाच्या दोन लसी दिल्या जातात. एक लस घेतल्यानंतर दुसरी लस २८ दिवसानंतर दिली जाते. कमीतकमी ४२ दिवसानंतर लसीमुळे व्यक्तीच्या अंगात ॲन्टिबॉडी तयार होते. त्यापूर्वी लस घेणाऱ्याने कोरोना नियमांचे गंभीरतेने पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा इतरांप्रमाणे त्यांनाही कोरोना संसर्ग होऊ शकतो.

-राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.

Web Title: Only a doctor who has been vaccinated against coronavirus can be infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.