शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केवळ 88 मिमी पाऊस, जिल्ह्यात ४ लाख २५ हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

By राजेश मडावी | Updated: July 6, 2023 17:33 IST

अपुऱ्या पावसाने ६५ हजार हेक्टरमध्येच पेरण्या

चंद्रपूर : खरीप हंगामाची तयारी करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना जुलैच्या पहिल्याच आठवड्यात अपेक्षाभंगाला सामाेरे जावे लागले. केवळ ८८ मी. मी. पाऊस झाल्याने ६५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली तर तब्बल ४ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. दमदार पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात एकूण ५० महसूल मंडळे आहे. यापैकी २९ महसूल मंडळात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. केवळ २१ महसूल मंडळात पेरणीयोग्य पाऊस झाला. जून महिन्याच्या शेवटीशेवटी जिल्ह्याच्या ठिकाणी थोडापाऊस झाला. याच पावसाच्या भरोवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, आता पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता स्थिती तयार झाली. जिल्ह्याचे खरीपा हंगामातील एकूण क्षेत्र ४ लाख ९० हजार हेक्टर आहे. जून महिन्यात ७ हजार २३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.  केवळ या महिन्याच्या शेवटी पाऊस झाला. याच पावसाच्या भरोवशावर काही शेतकऱ्यांनी पेरणी उरकून टाकली. आता पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

आठ-दहा गावांतच ९० मी. मी.पाऊस

जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस येतो. मात्र, यंदा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. मात्र, हा पाऊसही पुरेसा झाला नाही. जून महिन्याच्या २६ दिवसांत जिल्ह्यात केवळ ४२.८ मी.मी. पाऊस झाला. त्यातही केवळ सात ते दहा गावांतच ७५ ते १०० मीमी पाऊस झाला. अन्य ठिकाणी अजूनही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही.

यंदाचे पेरणी उद्दिष्ट गाठणार काय ?

जिल्ह्यात ६५ हजार क्षेत्रावर पेरणी झाली. त्यात भात ३५३३ हेक्टर, कापूस ४८७७६, तूर ४५२८, तर सोयाबीन ८८१० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यंदा चार लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र खरीपाचे आहे. यात एक लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात आणि कापूस, तर ८० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे.

आतापर्यंतच्या पेरणीची स्थिती (हेक्टरी)भात- ३ हजार ५३३कापूस- ४८ हजार ७७६तूर- ४ हजार ५२८सोयाबीन- ८ हजार ८१०

‘पावसाअभावी पेरणा रखडल्या आहेत. जमिनीत पुरेसा ओलावा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघावी. पेरणीसाठी घाई करणे योग्य नाही. ऊन तापल्यास दुबार पेरणीचा धोका आहे.’

- शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस