शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जि.प.शाळेच्या २५ टक्केच पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 5:00 AM

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडील इलेक्ट्रानिक सुविधांसदर्भात माहिती गोळा केली आहे. या माहितीमध्ये केवळ २५ ते ३० टक्केच पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात स्टडी फार्म होम योजना कितपत यशस्वी होते, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे

ठळक मुद्दे३५ टक्के पालकांकडे साधा मोबाईल : जि.प. शाळांमध्ये ‘स्टडी फार्म होम’ होणार का यशस्वी

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांची शिक्षणाची ओढ कमी होऊ नये, विद्यार्थी अभ्यासात गुंतून रहावे तसेच भविष्याची तयारी म्हणून शिक्षण विभागाने ‘स्टडी फार्म होम’ची तयारी सुरु केली आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडील इलेक्ट्रानिक सुविधांसदर्भात माहिती गोळा केली आहे. या माहितीमध्ये केवळ २५ ते ३० टक्केच पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात स्टडी फार्म होम योजना कितपत यशस्वी होते, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहेयावर्षी पहिल्यांदाच परीक्षा न होताच मार्च महिन्यामध्येच विद्यार्थ्यांना सुट्या लागल्या. त्यातच पुढील सत्र केव्हा सुरू होणार यासंदर्भात अजूनपर्यंत तरी कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी शिक्षण विभागाने पाऊल उचलने सुरु केले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडील इलेक्ट्रानिक साधनांची माहिती गोळा करण्यात आली आहे. या माहितीमध्ये ग्रामीण भागातील २५ ते ३० टक्के पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल सुविधा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, ३५ ते ४० टक्के पालकांकडे साधा मोबाईल असल्याचेही शिक्षकांच्या निदर्शनास आले असून काही जणांकडे मोबाईलच नाही तर काहींनी आर्थिक संकटामुळे बंद असलेला मोबाईल दुरुस्त सुद्धा केला नसल्याचे निदर्शनात आले आहे. काही इंग्रजी शाळांना स्टडी फॉर्म होम अभ्यासक्रमाला सुरूवात केली आहे. या उपक्रमाला इंग्रजी शाळांतील पालकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता त्यांना अ‍ॅन्ड्राईड मोबाईल परवडण्यासारखा नसल्याने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठीचा हा प्रयोग भविष्यात यशस्वी होतो की, फक्त कागदी घोडेच नाचविले जाते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.ग्रामीण पालकांची मनस्थितीच नाहीकोरोनाच्या महामारीमध्ये सर्वच व्यवहार ठप्प पडले आहे. अनेकांना जगण्या-मरण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाºया काही विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती कमजोर आहे. त्यामुळे त्यांच्याकडे साधा मोबाईल सुद्धा नाही. त्यामुळे मोबाईलद्वारे शिक्षण देण्याचा प्रयोग ग्रामीण भागात तरी यशस्वी होणार की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रम, राज्यस्तरावरील येणारे प्रोग्राम तसेच मनोरंजनात्मक माहिती मिळावी यासाठी पालकांच्या मोबाईलसंदर्भात माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये २५ ते ३० टक्केच पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल असल्याचे समोर आले आहे.-दीपेंद्र लोखंडेशिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प.चंद्रपूर

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा