२४ तासांत केवळ २ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:30 IST2021-01-19T04:30:09+5:302021-01-19T04:30:09+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासांत १५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर २ कोरोनाबाधित ...

Only 2 patients in 24 hours | २४ तासांत केवळ २ रुग्ण

२४ तासांत केवळ २ रुग्ण

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासांत १५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर २ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ८५२ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार २०८ एवढी झाली आहे. सध्या २६२ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८९ हजार ४९९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ६५ हजार ५६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील सहकारनगर येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३८२ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १२, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधित आलेल्या २ रुग्णांमध्ये भद्रावती एक व राजुरा येथे एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Only 2 patients in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.