शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात उरले शंभर वर्षांपूर्वीचे केवळ १० पिंपळवृक्ष

By admin | Updated: December 25, 2014 23:28 IST

हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात पवित्र मानली जाणारे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे चंद्रपुरातील १०० वर्षे पेक्षा जास्त वयाची पिंपळवृक्ष दुर्लक्षित पडली आहेत. पर्यावरण मित्रांनी शहरभर फिरून

प्रशासनानेही पुढाकार घ्यावा : पिंपळवृक्ष संवर्धनाची नितांत गरजचंद्रपूर : हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात पवित्र मानली जाणारे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे चंद्रपुरातील १०० वर्षे पेक्षा जास्त वयाची पिंपळवृक्ष दुर्लक्षित पडली आहेत. पर्यावरण मित्रांनी शहरभर फिरून या वृक्षांची पाहणी केली असता शंभर वर्षांपूर्वीची केवळ दहाच पिंपळवृक्ष शहरात शिल्लक असल्याचे दिसून आले. त्यामुळे चंद्रपूरसारख्या प्रदूषित शहरात पिंपळवृक्षांचे जतन करणे गरजेचे झाले आहे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनासाठी शासन कोट्यवधींचा खर्च करीत आहे. तरीही वृक्षांचा झपाट्याने ऱ्हास होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. चंद्रपूर शहराला लागून अनेक उद्योग आहेत. त्यामुळे चंद्रपूरही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. त्या तुलनेत शहरात हिरवळ दिसत नाही. शंभर वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांचेही चंद्रपूरकर व येथील प्रशासन जतन करू शकले नाही. साधारणत: वडाचे वृक्ष सर्वाधिक काळ जगतात. त्यानंतर पिंपळाच्या वृक्षांचेही वयोमान अधिक आहे. येथील पर्यावरणमित्र तथा ग्रिन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे व वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी चंद्रपूर शहरातील वयोवृद्ध पिंपळ वृक्षांची पाहणी केली असता शंभर व त्यापेक्षा अधिक वर्षांचे जुने पिंपळवृक्ष केवळ दहाच्या संख्येतच शिल्लक असल्याचे वास्तव पुढे आले. ही मोठी झाडे पर्यावरण व धार्मिक दृष्टया अतिशय महत्त्वाची असल्यामुळे त्यांचे जतन करणे गरजेचे झाले आहे.प्रा. चोपणे व सपकाळे यांनी शहरातील १०० ते २०० वर्ष वयाच्या पिंपळ वृक्षाच्या अस्तित्वाचा तपास करण्याची मोहीम हाती घेतली. यात सिव्हील लाईन परिसरात दोन, महाकाली परिसरात पाच, तुकूम परिसरात एक, बंगाली कॅम्प परिसरात एक, पठाणपुरा परिसरात एक अशी १०० ते २०० वर्षाचे मोठे दहाच वृक्ष शिल्लक असल्याचे दिसून आले. पिंपळाचे लहान वृक्ष शंभरच्या जवळपास आहेत. (शहर प्रतिनिधी)