सेतू केंद्र संचालकांची ऑनलाईन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST2021-03-18T04:27:07+5:302021-03-18T04:27:07+5:30
बल्लारपूर तालुक्यातील सर्व केंद्राचा सहभाग बल्लारपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर तालुक्यातील नागरिकांना व सेतू चालकांना कोरोना लसीकरण ऑनलाईन ...

सेतू केंद्र संचालकांची ऑनलाईन कार्यशाळा
बल्लारपूर तालुक्यातील सर्व केंद्राचा सहभाग
बल्लारपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर तालुक्यातील नागरिकांना व सेतू चालकांना कोरोना लसीकरण ऑनलाईन करताना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. ते कसे सुलभ होईल, यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
तहसीलदार संजय राईंचवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत बल्लारपूर तालुक्यातील सीएससी केंद्र व महाऑनलाईन अंतर्गत असलेल्या आपले सरकार सेतू संचालकांनी भाग घेऊन कोरोना लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी कशी करायची, याची माहिती जाणून घेतली. प्रोजेक्टरवर प्रशिक्षण डाटा ऑपरेटर व आदित्य दुबे, तरुण शर्मा, आशुतोष द्विवेदी यांनी दिले. यावेळी तहसीलदार संजय राईंचवार, नायब तहसीलदार रमेश कुळसंगे, चंद्रकांत तेलंग यांनी सेतू संचालकांना ४५ वर्षांच्या वरील नागरिकांना कोरोनाची लस देण्याकरिता विशेष मार्गदर्शन केले. सभेचे संचालन चंदू आगलावे यांनी केले. स्मिता डांगरे यांनी आभार मानले.