माना जमातीचा ऑनलाईन परिचय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST2021-01-25T04:28:52+5:302021-01-25T04:28:52+5:30
: माना जमात वधू-वर सूचक मंडळाच्या वतीने कोविड १९च्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रथमच ऑनलाईन वधू-वर परिचय ...

माना जमातीचा ऑनलाईन परिचय मेळावा
: माना जमात वधू-वर सूचक मंडळाच्या वतीने कोविड १९च्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रथमच ऑनलाईन वधू-वर परिचय मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ३१ जानेवारीला भद्रावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
याकरिता फेब्रुवारी, मार्च २०२०मध्ये झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत ६० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्यांनी आपली गुणपत्रिका मोबाईल क्रमांकासह अमोल हनवते यांच्या व्हाॅट्सॲपवर पाठवावी. उपवर-वधूनी नाव, शिक्षण, जन्मतारीख, उंची, व्यवसाय मामे कूळ व संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांकासह देविदास जांभुळे यांच्याकडे व्हॉट्सॲपवर पाठवावे. या कार्यक्रमात केवळ निवड झालेले विद्यार्थी आणि परिचय देणाऱ्या वधू-वर यांना एका पालकांसह प्रवेश देण्यात येणार आहे. इतर सर्व समाज बांधवांनी दिलेल्या लिंकवर घरी राहूनच कार्यक्रम पाहावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संजय गायकवाड, शंकर गरम डे, देविदास जांभुळे, देवराव घरात, किशोर चिकटे यांनी केले आहे.