‘एक गाव कोरोना मुक्त' अभियानाची 'वंधली'पासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:27 IST2021-05-22T04:27:06+5:302021-05-22T04:27:06+5:30

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या संकल्पनेतून माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ...

The 'One Village Corona Free' campaign started from 'Vandhali' | ‘एक गाव कोरोना मुक्त' अभियानाची 'वंधली'पासून सुरुवात

‘एक गाव कोरोना मुक्त' अभियानाची 'वंधली'पासून सुरुवात

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या संकल्पनेतून माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘एक गाव कोरोनामुक्त’ या अभियानाची सुरुवात वरोरा तालुक्यातील वंधली गावापासून झाली.

या अभियानाचे ऑनलाइन उद्घाटन ऑल इंडिया काँग्रेसच्या अध्यक्ष सुश्मिता देव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर, ममता भूपेश, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र महिला प्रदेश प्रभारी आमदार प्रणिती शिंदे, आ. प्रतिभा धानोरकर, प्रदेश महिला सचिव नम्रता आचार्य - ठेमस्कर यांची उपस्थिती होती.

ऑल इंडिया काँग्रेसच्या अध्यक्ष सुश्मिता देव यांनी या अभियानाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कोरोनाची भीतीही दूर होईल. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील ग्रामस्थांना कोरोनापासून बचाव करता येईल. आमदार प्रतिभा धानोरकर यादेखील जिल्ह्यात ग्रामीण भाग कोरोनामुक्त रहावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: The 'One Village Corona Free' campaign started from 'Vandhali'