एक किंवा दोन.. बस्स !
By Admin | Updated: September 16, 2014 23:37 IST2014-09-16T23:37:44+5:302014-09-16T23:37:44+5:30
काही वर्षापूर्वी कुटुंबनियोजनाचे महत्त्व नागरिकांना फारसे कळले नव्हते. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत होती. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना शासनाला सुरु

एक किंवा दोन.. बस्स !
११ हजारावर कुटुंबीयांनी केली नसबंदी : आरोग्य विभागाचे यश
चंद्रपूर : काही वर्षापूर्वी कुटुंबनियोजनाचे महत्त्व नागरिकांना फारसे कळले नव्हते. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत होती. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना शासनाला सुरु कराव्या लागल्या. तरीही याचा फारसा फायदा जाणवत नव्हता. अनेकवेळा शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबनियोजनाचे ‘टॉर्गेट’ देण्यात येत होते. आता मात्र परिस्थिती बदली आहे. वाढती बेरोजगारी, महागाईमुळे तसेच तंत्रज्ञानाने जनजागृती झाली आहे. कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी नागरिक स्वत:हून समोर येत आहे. यामुळेच मागील वर्षी जिल्ह्यात ११ हजार ९०८ महिला, पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे.
जिल्ह्यातील ९ हजार ८७६ कुटुंबीयांनी एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केली आहे. तर, चालु वर्षामधील पहिल्या पाच महिन्यात १ हजार ९९ कुटुंबीयांनी शस्त्रक्रिया आटोपल्या आहे. यातील ९८० जणांनी दोन मुलींवर शस्त्रक्रिया केली आहे. ही आकडेवारी शासकीय रुग्णालयातील आहे. तर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
सन २०१३-१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याला शासनाने ११ हजार ६०० कुटुंबीयांंनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे टार्गेट दिले होते. आरोग्य विभागाने १०३ टक्के टॉर्गेट पूर्ण केले आहे. चालू वर्षामध्ये २०१४-१५ मध्ये ११ हजार ७०४ कुटुंब नियोजन पूर्ण करण्याचा मानस विभागाने व्यक्त केला आहे. प्रथम पाच महिन्यामध्ये एक हजार १९६ जणांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली आहे. तर उर्वरित टार्गेट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याची निर्धार विभागाने व्यक्त केला आहे. (नगर प्रतिनिधी)