धनादेश अनादर प्रकरणी एक महिन्याची शिक्षा

By Admin | Updated: March 16, 2015 00:44 IST2015-03-16T00:44:29+5:302015-03-16T00:44:29+5:30

येथील मे.श्रीराम चिट्स (महा.) लि. शाखेत हनीफ गफ्फार शरीफ यांची पाच लाखाची भिसी होती.

One-month education in favor of disrespectful disrespect | धनादेश अनादर प्रकरणी एक महिन्याची शिक्षा

धनादेश अनादर प्रकरणी एक महिन्याची शिक्षा

चंद्रपूर : येथील मे.श्रीराम चिट्स (महा.) लि. शाखेत हनीफ गफ्फार शरीफ यांची पाच लाखाची भिसी होती. भिसीच्या रकमेची परतफेड करण्याकरिता हनीफ गफ्फार शरीफ यांनी कंपनीला १ लाख ५६ हजार ११६ रूपयांचा ५ डिसेंबर २०१० रोजी देना बँक शाखा चंद्रपूरचा धनादेश दिला.
मात्र खात्यात अपुरी रक्कम असल्याचा कारणामुळे अनादरीत झाल्याने कंपनीने हनीफ गफ्फार शरीफ यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे साक्षपुरावे व युक्तिवाद ऐकून हनीफ गफ्फार शरीफ यांना एक महिना साध्या कारावासाची शिक्षा व धनादेशाची रक्कम फिर्यादीस परत करावी व रक्कम परत न दिल्यास एक महिना अधिकतम शिक्षेचा आदेश दिला. अनेकदा धनादेश दिले जाते. मात्र खात्यावर तेवढी रक्कम राहत नसल्याचे अनेक प्रकार यापूर्वीही जिल्ह्यात घडले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: One-month education in favor of disrespectful disrespect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.