रामपुरी येथे धाड टाकून सागवानासह एक लाखांचे लाकडू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:52 IST2021-02-21T04:52:43+5:302021-02-21T04:52:43+5:30

रामपुरी येथील होमदेव पत्रे याच्या घरी रात्रीला जंगलातून अवैधरीत्या कटाई करून चोरून आणलेले लाकूड असल्याची माहिती ब्रह्मपुरी वनविभागाला मिळाली. ...

One lakh timber along with teak was seized in a raid at Rampuri | रामपुरी येथे धाड टाकून सागवानासह एक लाखांचे लाकडू जप्त

रामपुरी येथे धाड टाकून सागवानासह एक लाखांचे लाकडू जप्त

रामपुरी येथील होमदेव पत्रे याच्या घरी रात्रीला जंगलातून अवैधरीत्या कटाई करून चोरून आणलेले लाकूड असल्याची माहिती ब्रह्मपुरी वनविभागाला मिळाली. या आधारे फिरत्या पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष मेढे यांनी जंगलव्याप्त परिसरातील रामपुरी येथे रात्रीच्या सुमारास सापळा रचून धाड टाकली. दरम्यान, उच्च प्रतीचे सागवान व अन्य जातीचे लाकूड सदर इसमाच्या घरी आढळून आले. याप्रकरणी होमदेव पत्रे याच्यावर वनअधिनियम १९२७ अंतर्गत कारवाई करण्यात येऊन वनगुन्हा दाखल आला. त्याच्या घरी सापडलेले सागवान लाकूड जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई ब्रह्मपुरी वनविभागाचे मुख्य उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, सहायक वनसंरक्षक रामेश्वरी बोंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी वनविभागाच्या फिरत्या पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी मेढे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहायक वनसंरक्षक रामेश्वरी बोंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राम्हणे करीत आहेत.

Web Title: One lakh timber along with teak was seized in a raid at Rampuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.