एक लाख ६० हजार १२० बालकांना ‘दोन थेंंब जीवनाचे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:36+5:302021-02-05T07:39:36+5:30
चंद्रपूर : पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी रविवारी जिल्ह्यातील २ हजार ५५६ केंद्रांवर एक लाख ६० हजार १२० बालकांना डोस पाजण्यात ...

एक लाख ६० हजार १२० बालकांना ‘दोन थेंंब जीवनाचे’
चंद्रपूर : पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी रविवारी जिल्ह्यातील २ हजार ५५६ केंद्रांवर एक लाख ६० हजार १२० बालकांना डोस पाजण्यात आले. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कमी लसीकरण झाले. त्यामुळे सोमवारपासून आरोग्यसेवक, सेविका व डॉक्टर्स, पर्यवेक्षक, मोबाईल पथकातील आरोग्य कर्मचारी पथकांनी घरोघरी जाऊन बालकांचे लसीकरण सुरू केले आहे.
बालकांना पोलिओमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून दरवर्षी लसीकरण केले जाते. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने रविवारी घेण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा परिषद आराेग्य विभाग, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष नियोजन केले होते. परिणामी, एक लाख ६० हजार १२० बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. सोमवारपासून घरोघरी लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. जिल्ह्यातील एक लाख ७१ हजार ६३७ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्याला दोन लाख ४६ हजार डोस प्राप्त झाले आहेत. ० ते ६ वयोगटातील कुणीही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहू नये, यासाठी माता व पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील विभागीय लसीकरण
ग्रामीण - १,७३,१६१
शहर - २१,८५५
चंद्रपूर मनपा - ३५,००४