दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:42 IST2018-07-24T22:42:14+5:302018-07-24T22:42:35+5:30
येथील गजानन नगरी जवळील टर्निंग पार्इंटवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसल्याने एकाच जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी असल्याने त्याला चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता घडली.

दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा : येथील गजानन नगरी जवळील टर्निंग पार्इंटवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसल्याने एकाच जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी असल्याने त्याला चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता घडली.
नागेश्वर तानुजी देऊ रमले (५५) रा. चक पोंभुर्णा असे मृतकाचे नाव असून आशिष राजेश्वर मडावी (२७) रा. सातारा तुकूम असे जखमीचे नाव आहे. मंगळवारी पोंभुर्णा येथील आठवडी बाजार होता. बाजारासाठी नागेश्वर देऊरमले हे एमएच ३४ बीजी ४६६५ या क्रमांकाच्या दुचाकीने पोंभुर्णाकडे जात असताना एमएच ३४ एव्ही ३७२८ या क्रमांकाच्या दुचाकीने येत असलेल्या आशिष मडावी यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली. यात नागेश्वर हे काही अंतरावर फेकल्या गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर आशिष मडावी यांनाही गंभीर दुखापत झाली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार सुधीर बोरकुटे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आशिषवर पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.