एक ठार, तीन जखमी

By Admin | Updated: August 20, 2016 00:42 IST2016-08-20T00:42:21+5:302016-08-20T00:42:21+5:30

कोठारी नजीक खडीखदान मोडीवर दुचाकी व इंडिका कारची समोरासमोर धडक बसून...

One killed, three injured | एक ठार, तीन जखमी

एक ठार, तीन जखमी

कोठारीनजीक अपघात : दुचाकी व कारची धडक
कोठारी : कोठारी नजीक खडीखदान मोडीवर दुचाकी व इंडिका कारची समोरासमोर धडक बसून त्यात दुचाकी चालक विनोद कवाडे (५०) रा. चंद्रपूर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर संतोष वासुदेव उपरे (४५) रा. सास्ती, पंकज फसकुलवार रा. आष्टी जि. गडचिरोली व अमोल क्षिरसागर कार चालक जखमी झाले.
नातेवाईकाचे अंत्यसंस्कारासाठी विनोद कवाडे व संतोष उपरे दुचाकी क्र. एम.एच. ३४ वाय १७०० ने आलापलीकडे जात होते. अज्ञात कोठारीजवळ खडीखदान टर्निंगवर आष्टीकडून इंडिका का एमएच ३३ ए ९७० ने चंद्रपूरकडे येत असताना समोरासमोर धडक दिली. त्यात चौघे जखमी झाले. जखमींना चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. त्यात विनोद कवाडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेची माहिती कोठारी पो.स्टे.ला समजताच ठाणेदार देवेंद्र ठाकूर, पुंजडवार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. चौकशी अंती गुन्ह्याची नोंद करून कारवाई करण्यात आली. आष्टी कडून येणाऱ्या इंडिका कारची गती जास्त होती. खडीखदान वळणावर खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व दुचाकीवर आदळली. (वार्ताहर)

Web Title: One killed, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.