दोन दुचाकीच्या अपघातात एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:53 IST2020-12-17T04:53:13+5:302020-12-17T04:53:13+5:30

चिमूर : चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिमूर- मासळ रोडवरील सातारा टेकेपार फाट्याजवळ एका दुचाकीने दुसऱ्या ...

One killed, one injured in two-wheeler accident | दोन दुचाकीच्या अपघातात एक ठार, एक जखमी

दोन दुचाकीच्या अपघातात एक ठार, एक जखमी

चिमूर : चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिमूर- मासळ रोडवरील सातारा टेकेपार फाट्याजवळ एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक मारल्याने दुचाकीच्या मागे बसणाऱ्या युवकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकी चालक जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली.

विकास राणे (३५) रा. विहीरगाव असे मृतकाचे नाव आहे तर पंकज जांभुळे (३१) रा. खडसंगी असे जखमी युवकाचे नाव आहे. चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथील रहिवासी दिलीप घरत व विकास राणे हे सकाळी एमएच ३३ ई ४९०१ स्प्लेंडर या दुचाकीने नेरी येथे बाजाराला गेले होते. दोघेही बाजार करून चिमूर मार्गे विहीरगाव येथे जात असताना मासळ- सातारा फाट्याजवळ कोलरा येथून भरधाव येणाऱ्या एमएच ३४ एएन ५७८२ बजाज या दुचाकी वाहनाने जबरदस्त धडक दिली. यामध्ये विकास राणे याला जोरदार मार लागला तर दुसऱ्या दुचाकी चालक पंकज जांभुळे जखमी अवस्थेत पडला होता. रुग्णवाहिका येईपर्यंत जखमी विकास राणेला बराच रक्तस्त्राव झाला. दोन्ही जखमींना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पंकज जांभुळेवर उपचार सुरू आहेत. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.

Web Title: One killed, one injured in two-wheeler accident