दोन अपघातात एक ठार, एक जखमी

By Admin | Updated: March 29, 2015 01:06 IST2015-03-29T01:06:53+5:302015-03-29T01:06:53+5:30

दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये एक ठार तर, एक जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली.

One killed and one injured in two accidents | दोन अपघातात एक ठार, एक जखमी

दोन अपघातात एक ठार, एक जखमी

घुग्घूस : दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये एक ठार तर, एक जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. चंद्रपूर-घुग्घूस रस्त्यावर झालेल्या अपघातात दिनेश हरिशंकर यादव (४०) यांचा मृत्यू झाला. तर घुग्घूसमध्ये घडलेल्या घटनेत संजय मारोती पचारे ( मुरसा) हे जखमी झाले.
चंद्रपूर- नागपूर रस्त्यावर मोरवा टॉवरजवळ भद्रावतीकडून चंद्रपूरकडे जाणारी दुचाकी एमएच ३४ एएफ ६०९५ ने पायदळ जाणारे दिनेश हरिशंकर यादव (४०) यांना शुक्रवारी रात्री धडक दिली. या अपघातात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुचाकीस्वार महेश कटार (३२) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेमध्ये घुग्घूस ग्रामपंचायतीकडे दुचाकी एमएच ३४ एएम ३१५८ ने संजय मारोती पचारे हे जात असताना एमएच ३४ एएल ०९२२ या कारने धडक दिली. ही घटना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. यात संजय गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(वार्ताहर)

Web Title: One killed and one injured in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.