टिप्पर-सुमोच्या अपघातात १ ठार, ११ जखमी

By Admin | Updated: February 20, 2016 01:46 IST2016-02-20T01:46:38+5:302016-02-20T01:46:38+5:30

टिप्पर आणि टाटा सुमो भरधाव वेगात एकमेकांसमोर आल्याने झालेल्या अपघाता एक महिला जागीच ठार तर ११ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास....

One killed, 11 injured in Tipper-Sumo accident | टिप्पर-सुमोच्या अपघातात १ ठार, ११ जखमी

टिप्पर-सुमोच्या अपघातात १ ठार, ११ जखमी

नागभीड: टिप्पर आणि टाटा सुमो भरधाव वेगात एकमेकांसमोर आल्याने झालेल्या अपघाता एक महिला जागीच ठार तर ११ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास भिकेश्वर जवळ घडली. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.
अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव सुनीता दिलीप चौधरी (४५) असे आहे तर जखमींमध्ये बालाजी खेमये (४२), छत्रपती बाजीराव आवारी (५४), रामभाऊ माधव घुटे (३५) खुशाल गणेश वैद्य (४३), नानक विलास खेमये (११), बेबीबाई बालाजी खेमये (६२), दिलीप श्यामराव चौधरी (४८), अजय मोरेश्वर लंगनकर (५२), दशरथ डोमा निवसे (५९), श्यामराव लक्ष्मण भोयर (५८), अन्नपूर्णा छत्रपती आवारी (४०) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
चिमूर तालुक्यातील कळमगाव येथून एका कुटुंबातील सर्व नातेवाईक टाटा सुमो (एमएच- ३४/९२५०) या वाहणाने कार्यक्रमासाठी मिंथूर येथे जात होते. हे टाटा सुमो वाहन आणि ब्रह्मपुरीकडून रेती घेवून येणारे टिप्पर (एमएच- ४०/ वाय- ५३५३) या दोन वाहनात भिकेश्वर गावाजवळ जोरदार टक्कर झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींंना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना नागपूरला हलविण्यात आले. ठाणेदार बी.डी. मडावी यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: One killed, 11 injured in Tipper-Sumo accident