शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

भरधाव ट्रॅक्टर दुचाकीला धडकले; एक ठार, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 18:36 IST

ते दोघे वडसाकडे जात असतांना सुरबोडी-सोंदरी मार्गावर दुचाकी व ट्रॅक्टरची जबर धडक झाली.

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : समोरून येणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी-वडसा महामार्गावर घडली.

शिवा योगेश देसाई (१८) रा. देसाईगंज (वडसा) असे मृतकाचे तर महेश दयाराम आंबोने (२८) रा. सोंदरी असे जखमीचे नाव आहे. सध्या शेतातील रब्बी माल मळणीचा हंगाम परिसरात सुरू आहे. पिंपळगाव येथील ट्रॅक्टर मळणी यंत्र घेऊन ट्रॅक्टरचालक राजू श्रीराम धांडे (३१) हा चिखलगांव येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी मालाची मळणी करून पिंपळगाव येथील स्वगावी ट्रॅक्टरने सोंदरी-सुरबोडी मार्गाने येत होता. तर विरुद्ध दिशेने सोंदरीवरून महेश आंबोने व शिवा देसाई हे दोघे वडसाकडे जात होते.

दरम्यान, सुरबोडी-सोंदरी मार्गावर दुचाकी व ट्रॅक्टरची जबर धडक झाली. या अपघातात शिवा देसाई जागीच ठार झाला तर महेश आंबोने पाय तुटल्याने गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण पिसे करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू