रानडुकरांचा कळप आल्याने दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:37 IST2021-02-27T04:37:47+5:302021-02-27T04:37:47+5:30

भिसी : दुचाकीवर डबल सीट बसून गावाकडे जात असताना अचानक रानडुकरांचा कळप गाडीसमोर आला. गाडी स्लिप झाल्यामुळे ...

One died in a two-wheeler accident due to a herd of cows | रानडुकरांचा कळप आल्याने दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

रानडुकरांचा कळप आल्याने दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

भिसी : दुचाकीवर डबल सीट बसून गावाकडे जात असताना अचानक रानडुकरांचा कळप गाडीसमोर आला. गाडी स्लिप झाल्यामुळे खाली पडली. गाडीवर मागे बसून असलेला इसम गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास भिसीपासून पूर्वेस सहा किमी अंतरावर पुयारदंड गावाच्या समोर घडली.

मृतकाचे नाव रमेश भिवाजी पाटील (५२) असून, मृतक गडपिपरी येथील रहिवासी होता. भिसी येथून दवाखान्याचे काम आटोपून रमेश पाटील हे संतोष घुगल ( रा.गोठणगाव ) यांच्या दुचाकीवर मागे बसून गडपिंपरीला जात होते. अचानक गाडीसमोर रानडुकरांचा कळप आला. चालकाला तोल सावरता न आल्याने गाडी स्लिप झाली व अपघात झाला. यात गंभीर जखमी झाल्यामुळे घटनास्थळीच रमेश पाटील यांचा मृत्यू झाला.

भिसी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह चिमूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: One died in a two-wheeler accident due to a herd of cows