अंगणवाडी कार्यकर्त्यांची एकदिवसीय कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:33+5:302021-04-02T04:29:33+5:30

: ...

One day workshop for Anganwadi workers | अंगणवाडी कार्यकर्त्यांची एकदिवसीय कार्यशाळा

अंगणवाडी कार्यकर्त्यांची एकदिवसीय कार्यशाळा

: समाजकल्याण विभाग पं. स. चिमूर यांच्यावतीने शंकरपूर येथे हनुमान किल्ला मंदिर येथे अंगणवाडी कार्यकर्त्या व पर्यवेक्षिका यांची एकदिवसीय कार्यशाळा पार पडली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच साईश वारजूकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अशोक चौधरी व ग्रामसेवक के. टी. गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता शंभरकर, पर्यवेक्षिका वाघमारे उपस्थित होते.

या कार्यशाळेत दिव्यांग प्रतिबंधात्मक माहिती व यावर उपाय व दिव्यांग्याकरिता विविध योजना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक के. टी. गायकवाड, तर संचालन अंगणवाडी सेविका कालिंदा ढोक यांनी केले.

Web Title: One day workshop for Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.