विमा अभिकर्त्यांचे एकदिवसीय विश्रांती आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST2021-03-24T04:26:13+5:302021-03-24T04:26:13+5:30
बल्लारपूर : लाईफ इन्शुरन्स एजंट असोसिएशन बल्लारपूर शाखेच्यावतीने अभिकर्त्यांच्या मागण्या घेऊन एक दिवसीय विश्रांती आंदोलन करून विमा व्यवसाय बंद ...

विमा अभिकर्त्यांचे एकदिवसीय विश्रांती आंदोलन
बल्लारपूर : लाईफ इन्शुरन्स एजंट असोसिएशन बल्लारपूर शाखेच्यावतीने अभिकर्त्यांच्या मागण्या घेऊन एक दिवसीय विश्रांती आंदोलन करून विमा व्यवसाय बंद ठेवला.
यावेळी सर्व विमा अभिकर्त्यांनी बल्लारपूर शाखेच्या गेट वर धरणे देऊन अभिकर्त्यांच्या विविध मागण्या मंजूर करण्याच्या घोषणा दिल्या. यामध्ये एलआयसीचे खासगीकरण करणे बंद करा, पॉलिसी प्रीमियमवर जीएसटी बंद करा, एजंटचे कमिशन व ग्रॅच्युटी वाढवा, ऑनलाईन मार्केटिंग व डायरेक्ट मार्केटिंग बंद करा तसेच इतर मागण्या मंजूर करण्याची मागणी केली.
काम बंद विश्रांती आंदोलनात बल्लारपूर एजंट असोसिएशनचे अध्यक्ष किशोर अगस्ती, सचिव शैलेश वैद्य, तसेच संदेश करवाडे, धनंजय बोरडे, जी. के. भोयर, श्याम मेश्राम, प्रवीण धोपटे, सुनील झुरमुरे, प्रशांत घोडे, मोरेश्वर दुर्गे, नितीन पुददटवार, विजय बट्टे, नरेश भुरसे व शाखेच्या सर्व अभिकर्त्यांची उपस्थिती होती.