एक दिवस मजुरांसोबत
By Admin | Updated: October 14, 2015 01:30 IST2015-10-14T01:30:09+5:302015-10-14T01:30:09+5:30
‘एक दिवस मजुरांसोबत’ या संकल्पनेंतर्गत पंचायत समिती चंद्रपूर, ग्रामपंचायत जुनोना येथे शनिवारी एक दिवस मजुरांसोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एक दिवस मजुरांसोबत
चंद्रपूर : ‘एक दिवस मजुरांसोबत’ या संकल्पनेंतर्गत पंचायत समिती चंद्रपूर, ग्रामपंचायत जुनोना येथे शनिवारी एक दिवस मजुरांसोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तर अध्यक्षस्थानी जुनोनाचे सरपंच विश्वजित लेनगुरे होते.
कार्यक्रमात तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून सर्व योजनांची माहिती मजुर व ग्रामस्थांना दिली. तसेच या कार्यक्रमाला डॉ.महेंद्र कल्याण यांनी उपस्थित राहून मजुर व ग्रामस्थांच्या अडीअडचणी व समस्येविषयी संवाद साधला.
त्यांच्या हस्ते मजुरांना जॉब कार्ड वितरित करण्यात आले. तसेच यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) बोदेले, पंचायत समिती सभापती बंडु माकोडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सरीता कुडे, पंचायत समिती सदस्य दयानंद बंकुवाले, तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजू आनंदपवार, गट विकास अधिकारी (रोहयो) जि.प. प्रणव बक्षी यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला उपसभापती रती जयस्वाल, जि.प. सदस्य शांताराम चौखे, सुरेखा पाटील, पंचायत समिती सदस्य वर्षा ताजने, माला रामटेके यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)