विनयभंगप्रकरणी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:25 IST2021-01-22T04:25:42+5:302021-01-22T04:25:42+5:30
आरोपीचे नाव अभिषेक अशोक कोहपरे (वय १९, रा. पारडी गायमुख) असे आहे. तो तळोधी (बा.) येथील एका महाविद्यालयात शिक्षण ...

विनयभंगप्रकरणी एकाला अटक
आरोपीचे नाव अभिषेक अशोक कोहपरे (वय १९, रा. पारडी गायमुख) असे आहे. तो तळोधी (बा.) येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. पीडित मुलगीही तिथेच शिक्षण घेत होती. ती अल्पवयीन आहे. तिचे गाव ब्रम्हपुरी तालुक्यातील असून ती इकडे मामाकडे राहून शिक्षण घेत होती. दरम्यान, त्याचे त्या तरुणीसोबत प्रेम जुळले. प्रेमात सोबत राहण्याच्या आणाभाका झाल्या आणि अचानक काहीतरी दोघांत बिनसले. दरम्यान, आरोपी मुलाने तिच्या गावाला जाऊन तिला मारपीट, शिवीगाळ, धमकी दिली आणि प्रेमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मुलगी भयभीत झाली आणि अभिषेक विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर कलम ३५४ (क) भादंवि कलम १२,१४ पाक्सो, कलम ६७ (क) माहिती तंत्रज्ञान कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.