दरोडाप्रकरणी एकाला अटक

By Admin | Updated: November 29, 2015 01:54 IST2015-11-29T01:54:51+5:302015-11-29T01:54:51+5:30

स्थानिक राष्ट्रवादीनगरमध्ये १५ नोव्हेंबरच्या रात्री दरोडा घालणाऱ्या टोळीतील एकाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

One arrested for dacoity | दरोडाप्रकरणी एकाला अटक

दरोडाप्रकरणी एकाला अटक


चंद्रपूर: स्थानिक राष्ट्रवादीनगरमध्ये १५ नोव्हेंबरच्या रात्री दरोडा घालणाऱ्या टोळीतील एकाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शंकर संदीप भोसले (२७) असे आरोपीचे नाव असून तो हिंघणघाट तालुक्यातील रिमडोह येथील रहिवासी आहे. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे अन्य सहा साथिदार फरार आहेत. मात्र त्यांची नावे निष्पन्न झाली असून त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, असे संदीप दिवाण यांनी पत्रकारांना सांगितले. अद्याप दरोड्यातील मुद्देमाल हस्तगत झाला नाही.
या घटनेच्या तपासासाठी विविध पथकांचे गठण केले होते. दरोड्यातील आरोपीला जेरबंद करण्यात यश आल्याने जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दुर्गापूर पोलिसांसाठी १० हजार रुपयांचा रिवॉर्ड घोषित केला. (प्रतिनिधी)

Web Title: One arrested for dacoity