माजरी येथे सव्वा किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:21+5:302021-03-22T04:25:21+5:30
भद्रावती : तालुक्यातील माजरी येथे अवैधरीत्या गांजा विक्री करणाऱ्यास अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून अठरा हजारांचा गांजा जप्त केला ...

माजरी येथे सव्वा किलो गांजा जप्त
भद्रावती : तालुक्यातील माजरी येथे अवैधरीत्या गांजा विक्री करणाऱ्यास अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून अठरा हजारांचा गांजा जप्त केला आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली.
शंकर वर्मा, रा. बांधा दफाइ माजरी असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो आपल्या राहत्या घरी गांजा विक्री करत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार विनीत घागे यांना मिळाली होती. त्याआधारे घरी धाड टाकली असता त्याच्याकडे एक किलो २४३ ग्रॅम गांजा व इतर साहित्य असा २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वर्मा यास ताब्यात घेण्यात आले आहे. ठाणेदार विनीत घागे, सहायक पोलीस निरीक्षक अजित सिंग देवरे, चोपणे, जुमडे ,गुरनुले, मोगम शिंदे, रामटेके यांच्या पथकाने ही कारवाई केली.