शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

ज्या दिवशी होती हळद, त्याच दिवशी रचावे लागले तिचे सरण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 16:44 IST

हळद लागण्यापूर्वीच घेतला जगाचा निरोप: विसापुरातील घटनेने हेलावले समाजमन

लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : जो आवडत होता, त्याच्याशीच तिचे लग्न जुळले. भावी आयुष्याचे स्वप्न ती रंगवत होती. एक दिवसानंतर तिचा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. २८ एप्रिलला तिची हळद होती. परंतु, निर्दयी काळाने त्याच वेळी तिचा श्वासच हिरावून नेला. हळदीच्याच दिवशी तिचे सरण रचण्याची वेळ तिच्या बापावर आणली. निःशब्द होऊन वडील व भावी पती तिच्या मृतदेहाकडे एकटक पाहातच होते. हे पाहून गावकऱ्यांचेसुद्धा डोळे पाणावले.

ही दुर्दैवी घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे घडली. वैशाली महादेव गेडाम (२४) असे मृत पावलेल्या भावी वधूचे नाव आहे. तिला काविळ आजार झाला होता. मात्र, उपचारादरम्यान नागपूर येथील एम्स रुग्णालयात २७ एप्रिलला सायंकाळी ८:०० वाजता तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

वैशालीचा विवाह तिला आवडत असलेल्या गावातीलच जय टेकाम या युवकासोबत २९ एप्रिल २०२४ ला विसापूर येथे होणार होता. आठ दिवसांपूर्वी तिचे पोट खूप दुखत होते. अचानक जास्त अस्वस्थता वाटत असल्याने तिला चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. चार दिवस तिच्यावर उपचार झाल्यावरही प्रकृतीत पाहिजे तशी सुधारणा झाली नसल्याने डॉक्टरांनी तिला काविळसदृश आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने तिला नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. तिथे तिच्यावर चार दिवस उपचार चालला होता, परंतु, प्रकृती आणखीनच खालावत होती. २७ एप्रिलला लग्नकार्य असल्याने तिला हळद लावण्याचा कार्यक्रम आयोजित होता. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी तिची प्रकृती खूपच गंभीर झाली. ही बाब गावकऱ्यांना माहीत झाल्यावर तिच्या उपचारासाठी सर्वांनी यथाशक्ती आर्थिक मदत केली. परंतु, त्या मदतीचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर रात्री ८:०० वाजता उपचाराला दाद देणे तिने बंद केले आणि तिची प्राणज्योत मालवली.

सर्वांचेच अश्रू अनावरशर्थीचे प्रयत्न करूनसुद्धा आपण तिला वाचवू शकलो नाही, या विवंचनेत तिचे वडील व भावी पती निःशब्द होऊन तिच्या मृतदेहाकडे एकटक पाहात होते. ज्या दिवशी तिची हळद होती, त्या दिवशी तिचे सरण रचण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे पाहून परिसरातील नागरिकांचे अश्रू अनावर झाले होते. 

टॅग्स :marriageलग्नDeathमृत्यू