इरई नदीवरील जुना पूल होऊ शकतो बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 06:00 AM2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:37+5:30

या संदर्भातील मागणीचे निवेदन इको-प्रोने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. जिल्ह्यात दिवसागणिक होत असलेली भुजल पातळीतील घट चिंताजनक आहे. तसेच पावसाळयाच्या दिवसात अनेक नदी-नाले दुथळी भरून वाहतात. मात्र पावसाळा संपताच कोरडे पडतात. या सर्व नद्यांचे स्वरूप आता हंगामी अशा स्वरूपाचे उरले आहे.

The old bridge over the Erai river may become a dam | इरई नदीवरील जुना पूल होऊ शकतो बंधारा

इरई नदीवरील जुना पूल होऊ शकतो बंधारा

googlenewsNext
ठळक मुद्देइको-प्रोची मागणी : इतर जुन्या पुलांचेही बंधारे बनवा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इरई नदीवर पठाणपुरा गेट बाहेरील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या पुलामुळे बाजुला असलेल्या जुन्या पुलांचे रूपांतर बंधाऱ्यांमध्ये होऊ शकते. असा प्रयोग दाताळा मार्गावरील इरई नदीपात्रात होऊ शकतो. असे झाल्यास पाण्याची साठून राहण्यास मदत होणार आहे.
या संदर्भातील मागणीचे निवेदन इको-प्रोने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. जिल्ह्यात दिवसागणिक होत असलेली भुजल पातळीतील घट चिंताजनक आहे. तसेच पावसाळयाच्या दिवसात अनेक नदी-नाले दुथळी भरून वाहतात. मात्र पावसाळा संपताच कोरडे पडतात. या सर्व नद्यांचे स्वरूप आता हंगामी अशा स्वरूपाचे उरले आहे. भर उन्हाळयात तर या नदी-नाल्यास पाणीसुध्दा नसते. मागील काही वर्षात अनेक नदीपात्रात नवीन पूल बांधण्यात आले आहे. जुने पूल तसेच आहेत. या पुलांचे बंधाºयात रूपांतर करण्याचे कार्य हाती घेतल्यास जलसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य होऊ शकते. तसेच नदीलगतच्या शेतीनासुध्दा सिंचनाची तर जनावरांना पाण्याची सोय काही प्रमाणात सोय होऊ शकेल, असे इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
भुजल पुनर्भरणाची गरज लक्षात घेऊन ‘पाणी अडवा-पाणी जीरवा’ काळाची गरज झालेली आहे. इको-प्रोच्या माध्यमाने शहरात ‘रेनवॉटर हॉर्वेस्टींग व शोषखड्डा बांधकाम’ करण्यात यावे, करिता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गतच चंद्रपूर शहराला लागून वाहणाºया इरई व झरपट नदीवरसुध्दा ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आल्यास शहरास लागून वाहणाºया या नद्यामुळे शहरातील भुजल पातळी वाढण्यास मदत होईल.
चंद्रपूर तालुक्यातील बांधकाम सुरू असलेले दाताळा रोड व पठाणपुरा बाहेरील दोन्ही इरई नदीवरील पुलांचे बांधकाम सुरू आहे. तात्काळ स्वरूपात शक्य असलेले पठाणपुरा बाहेरील व दाताळा रोडवरील नव्या पुलांच्या बांधकामानंतर उपयोगात नसलेल्या या दोन्ही जुन्या पुलांचे बंधाºयात रूपांतर करणे सहज शक्य असून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागास सूचना देण्यात याव्या, अशी मागणी इको प्रोने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिलेले आहे.

यापूर्वी झाला आहे प्रयोग
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असलेला ‘जानाळा-पोभुर्णा’ रोडवरील अंधारी नदीवर करण्यात आला आहे. नवा पूल आणि जुन्या पुलाचा बंधारा असे बांधकाम करण्यात आले आहे. जिल्ह्यात वाहणाºया वर्धा, उमा, अंधारी, पोथरा, इरई, झरपट आदी नदीवर ठिकठिकाणी नवीन पुलांचे बांधकाम झालेले आहे किंवा होणार आहे. त्याठिकाणी जुन्या पुलाचे बंधारे करण्यात यावे, अशी मागणीही इको प्रोने केली आहे.

Web Title: The old bridge over the Erai river may become a dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी