वरोऱ्यातील महाविद्यालये बंद
By Admin | Updated: September 9, 2016 00:49 IST2016-09-09T00:49:27+5:302016-09-09T00:49:27+5:30
मुलींच्या स्वच्छतागृहात कॅमेरा लावणाऱ्या विकृत मानसिकतेच्या प्राध्यापकाला तात्काळ गजाआड करावे,

वरोऱ्यातील महाविद्यालये बंद
आंदोलन : विकृत प्राध्यापकाला अटक करा
वरोरा : मुलींच्या स्वच्छतागृहात कॅमेरा लावणाऱ्या विकृत मानसिकतेच्या प्राध्यापकाला तात्काळ गजाआड करावे, या मागणीकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजयुमो व बजरंग दलाच्या वतीने आज गुरुवारी आंदोलन छेडत वरोरा शहरातील सर्व महाविद्यालये बंद पाडली.
घृणास्पद कृत्य करणाऱ्या प्रा. प्रतिश गंधारे याच्यावर वरोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्राध्यापकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तो फरार आहे. या प्राध्यापकाला तत्काळ अटक करावी, याकरिता आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा व बजरंग दलाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी प्राध्यपकाविरोधात घोषणा देत शहरातील सर्व महाविद्यालये बंद पाडली. निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना वरोरा पोलिसांनी स्थानबध्द केले होते. यामध्ये प्रमोद बेलेकर, गणेश उराडे, वैभव चिंचोलकर, कीर्ती वाणी, श्रुती ढवस, प्रकाश म्हसाळकर आदींचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)