सीईओंच्या गावभेटींमुळे अधिकारी घामाघूम
By Admin | Updated: December 9, 2014 22:47 IST2014-12-09T22:47:11+5:302014-12-09T22:47:11+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले तथा मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी सध्या गावागावांत जाऊन ग्रामस्थांच्या भेटी घेणे सुरु केले आहे. या भेटींमध्ये जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी

सीईओंच्या गावभेटींमुळे अधिकारी घामाघूम
चंद्रपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले तथा मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी सध्या गावागावांत जाऊन ग्रामस्थांच्या भेटी घेणे सुरु केले आहे. या भेटींमध्ये जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. सोबतच नागरिकांच्या समस्या ऐकून तत्काळ निराकरण करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. तर तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना थंडीच्या दिवसात चांगलाच घाम फुटत आहे. विशेष म्हणजे, कामात हयगय केल्यास तत्काळ कारवाई होणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांपासून तर कर्मचारी सध्या कामाला लागल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेन जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्नही केले जात आहे. स्वच्छत: मिशन अंतर्गत विविध तीन ते चार पथक तयार करण्यात आले आहे. या पथकांच्या माध्यमातून गावागावांत प्रबोधन करण्यात येत असून नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे खुद्द सीईओ गावागावांत जाऊन गृहभेट घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. चक्क सिईओ आपल्या घरी पाहून अनेकांना समाधान वाटत आहे. त्यामुळे गावातील समस्या ते थेट सिईओंकडे कथन करीत आहे. यामुळे उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडत आहे. काही तालुक्यांमध्ये शौचालयाचे बांधकाम करूनही लाभार्थ्यांना पैसे मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. तक्रार येताच सीईओंना संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचीही माहिती मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिक, लाभार्थ्यांना त्रास व्हायला नको. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळावी, हयगय सहन करून घेतली जाणार नाही, असेही सीईओंनी बजावले आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलाच धाम फुटत आहे. वर्षानुवर्ष धुळखात असलेल्या पंचायत समितीपासून तर ग्रामपंचायतपर्यंतच्या फाईल मागील काही दिवसांमध्ये बाहेर आल्या आहे. (नगर प्रतिनिधी)