प्रभारी अधिकाऱ्यावर ३४ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST2021-02-20T05:21:59+5:302021-02-20T05:21:59+5:30

खडसंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला खडसंगीसह परिसरातील ३२ गावे जोडली आहेत. हे आरोग्य केंद्र उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गावर आहे. ...

The officer in charge is responsible for the health of 34,000 citizens | प्रभारी अधिकाऱ्यावर ३४ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी

प्रभारी अधिकाऱ्यावर ३४ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी

खडसंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला खडसंगीसह परिसरातील ३२ गावे जोडली आहेत. हे आरोग्य केंद्र उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गावर आहे. या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने या केंद्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, या आरोग्य केंद्राला जुळलेल्या ३४ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डाॅक्टर निखिल कामडी यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

खडसंगी ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित येते. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून, येथील एक वैद्यकीय अधिकारी डाॅ. रणदिवे प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी येथे आल्याआल्याच काही दिवसांतच चंद्रपूर येथील ख्रिस्तानंद दवाखान्यात कोविड सेंटरला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची ड्युटी लावली, तर दुसरे वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण ननावरे यांची (एमडी) या उच्च शिक्षणाकरिता नागपूर येथे नंबर लागल्यामुळे त्यांनी आपला खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सोपविला. त्यामुळे खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाही. नेरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले वैद्यकीय अधिकारी निखिल कामडी यांना सध्या खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून ३२ गावांतील ३४ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. मात्र, कामडी यांचे फेब्रुवारी म्हणजे याच महिन्यात काही दिवसांतच लग्न असल्याने ते कायमस्वरूपी प्राथमिक आरोग्य केंद्रात राहू शकणार नाही. लवकरच सुटीवर जाणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाच्या आरोग्य केंद्रात कायम डॉक्टर देण्याची मागणी प्रमोद राऊत यांनी केली आहे.

Web Title: The officer in charge is responsible for the health of 34,000 citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.