बांधकाम विभागाचे कार्यालय विकासाचा केंद्रबिंदू ठरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST2021-02-05T07:36:57+5:302021-02-05T07:36:57+5:30
पोंभुर्णा : शहरात व तालुक्यात आम्ही विकासाची दीर्घ मालिका तयार केली. अनेक विकासकामे या शहरात व तालुक्यात प्रगतीपथावर आहेत. ...

बांधकाम विभागाचे कार्यालय विकासाचा केंद्रबिंदू ठरावे
पोंभुर्णा : शहरात व तालुक्यात आम्ही विकासाची दीर्घ मालिका तयार केली. अनेक विकासकामे या शहरात व तालुक्यात प्रगतीपथावर आहेत. या विकासकामांचे कार्यान्वयन उत्तम पध्दतीने व्हावे, यासाठी पोंभुर्णा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता स्तराचे कार्यालय उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केला. हे कार्यालय पोंभुर्णा शहर व तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरावा, अशी अपेक्षा माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
पोंभुर्णा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता अनंत भास्करवार, उपविभागीय अभियंता टांगले, गजानन गोरंटीवार, विनोद देशमुख, अजित मंगळगिरीवार, ईश्वर नैताम, चरण गुरनुले, नहलेश चिंचोलकर आदींची उपस्थिती होती.