सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्री घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST2021-01-08T05:34:48+5:302021-01-08T05:34:48+5:30
सरपंच ॲड. शर्मिला रामटेके, उपसरपंच विजय बोरकुटे, महिला राजसत्ता आंदोलनाच्या जयश्री कुंभरे, निरंजना सोनटक्के, देवकन्या पांडव, पांडुरंग ...

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्री घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी
सरपंच ॲड. शर्मिला रामटेके, उपसरपंच विजय बोरकुटे, महिला राजसत्ता आंदोलनाच्या जयश्री कुंभरे, निरंजना सोनटक्के, देवकन्या पांडव, पांडुरंग रामटेके, अतुल पांडव, विजय नवघडे यांची यावेळी उपस्थिती होती. ‘सावित्री घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी’ हा ऑनलाईन कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील महिला व मुलींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. कार्यक्रमात लहान लहान मुली सावित्रीबाई फुले यांचा वेष परिधान करून आल्या होत्या. या ऑनलाईन कार्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, खासदार सुप्रिया सुळे, सी.एल.जी.एफ. लंडनच्या कार्यक्रम अधिकारी अनुया कुंवर, संविधान संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश सावंत, मालती सदने, दत्ता गुरू यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र व आजची स्त्री याबद्दल माहिती दिली. यावेळी सरपंच ॲड. रामटेके, जयश्री कुंभरे यांनीही मार्गदर्शन केले.