अर्धवट नाली खोदकामामुळे वाहतुकीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:17 IST2019-02-24T23:16:53+5:302019-02-24T23:17:10+5:30
चिमूर मार्गावर सुरू असलेल्या नालीचे खोदकाम मागील एक महिन्यापासून अर्धवट आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास आणि वाहनांच्या रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले.

अर्धवट नाली खोदकामामुळे वाहतुकीला अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ (बु.) : चिमूर मार्गावर सुरू असलेल्या नालीचे खोदकाम मागील एक महिन्यापासून अर्धवट आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास आणि वाहनांच्या रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे.
गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले.
कंत्राटदाराने नाली खोदून काम बंद केले. मुख्य रस्त्याला लागूनच नालीचे खोदकाम झाल्याने नागरिकांची गोची झाली. बाजुलाच आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कार्यालय आहे. तेथील पंटागणात पिण्याच्या पाण्याची विहीर व कृषी केंंद्र असल्यामुळे नागरिकांनी तात्पुरती सुविधा करून पुढे जात आहेत. पण, वाहने तसेच बैलबंडी नेता येत नाही. याच मार्गाने विद्यार्थी दररोज शाळेत जातात. नालीचे खोदकाम तीन ते चार फूट खोल आणि तेवढीच रुंदी आहे.
रात्रीच्या सुमारास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नालीचे खोदकाम करून एक काम बंद करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. परिसरातील लोेकप्रतिनिधी याच मार्गावरून तालुकास्थळी जातात. पण, याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. मुख्य मार्गावरील या धोकादायक नालीमुळे, विद्यार्थी शेतकरी व गावकरी त्रस्त आहे.
संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोका पाहणी करून बांधकाम पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.