वनाधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याशी अश्लील कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:42+5:302021-01-13T05:11:42+5:30
वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभागाच्या पिपरबोडी, लोहारा व अन्य रोपवाटिका येथे काम करीत असताना आरोपी अधिकाऱ्याने पीडित महिला अधिकाऱ्यास शारीरिक ...

वनाधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याशी अश्लील कृत्य
वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभागाच्या पिपरबोडी, लोहारा व अन्य रोपवाटिका येथे काम करीत असताना आरोपी अधिकाऱ्याने पीडित महिला अधिकाऱ्यास शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. पीडित महिला अधिकाऱ्याने त्याला वारंवार नकार दिला. सलग दोन वर्षापासून विभागीय वनाधिकारी सातत्याने हा संतापजनक प्रकार करीत होता. त्यांच्या जाचाला कंटाळून ६ व ७ जानेवारी रोजी दोन दिवसांची रजा टाकली. रजेवर असतानाही वनाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे काम असल्याचे सांगून कार्यालयात बोलावले. त्यांच्या कक्षात जाताच त्यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर अश्लील चित्रफीत दाखविण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला, असा आरोप या अधिकाऱ्यावर आहे. शिवाय जबरी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचेही पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास मागील वर्षाचा कार्यालयीन गोपनीय अहवाल खराब करेन. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दोषारोपण करून निलंबित करण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळही केल्याचे तक्रारीत पीडित महिला अधिकाऱ्याने म्हटले आहे. या प्रकरणी पीडिताच्या तक्रारीवरुन विनयभंग, लैंगिक चाळे केल्याप्रकरणी भादंवि ३५४, ३५४ ए, ३५४ बी, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हाके करीत आहेत.