अश्लील शिवीगाळ, सरपंचाची सदस्याविरुद्ध पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:24 IST2021-02-20T05:24:43+5:302021-02-20T05:24:43+5:30

गोंडपिपरी : तालुक्यातील मौजा सकमूर येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष मुगलवार यांनी ग्रामपंचायतींतर्गत सुरू असलेल्या रस्ता कामात अडथळा निर्माण करत ...

Obscene abuse, complaint against sarpanch member lodged with police | अश्लील शिवीगाळ, सरपंचाची सदस्याविरुद्ध पोलिसात तक्रार

अश्लील शिवीगाळ, सरपंचाची सदस्याविरुद्ध पोलिसात तक्रार

गोंडपिपरी : तालुक्यातील मौजा सकमूर येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष मुगलवार यांनी ग्रामपंचायतींतर्गत सुरू असलेल्या रस्ता कामात अडथळा निर्माण करत अश्लील शिवीगाळ केली, अशी तक्रार सरपंच अपर्णा रेचनकर यांनी लाठी पोलीस ठाण्यात दिली आहे. तत्पूर्वी मागील पंचवार्षिकमध्ये मंजूर शासकीय योजनेंतर्गत रस्ता कामासाठी कच्चा माल सकमूर येथे आणण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका लागताच रस्त्याचे काम रखडले. ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत अपर्णा रेचनकर या महिला राखीव प्रवर्गातून सरपंचपदी विराजमान झाल्या. त्यांनी लगेच रखडलेल्या रस्ता कामाला सुरूवात केली. मात्र, ग्रामपंचायत सदस्य संतोष मुगलवार यांनी रस्ता कामावरील मजुरांना शिवीगाळ करत अडथळा निर्माण केला. मजुरांचे घमेले, फावडे व अन्य साहित्यही सोबत नेले तसेच आपल्याला अश्लील शिवीगाळ केली, असा आरोप सरपंचांनी तक्रारीत केला आहे. या तक्रारीची चौकशी ठाणेदार राठोड करत आहेत.

Web Title: Obscene abuse, complaint against sarpanch member lodged with police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.