हे गणराया, ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी सद्बुद्धी दे !

By Admin | Updated: September 6, 2016 00:42 IST2016-09-06T00:42:58+5:302016-09-06T00:42:58+5:30

हे गणराया, तुझ्या आगमनाची ब्रह्मपुरीकर व पंचक्रोशितील भक्तगत दरवर्षी वाट पाहात असतात.

O Ganaraya, give goodwill to the Brahmapuri district! | हे गणराया, ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी सद्बुद्धी दे !

हे गणराया, ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी सद्बुद्धी दे !

९ सप्टेंबरला धरणे आंदोलन : सार्वजनिक गणेश उत्सवासोबत घरगुती उत्सवाचे मोठे रुप
ब्रह्मपुरी : हे गणराया, तुझ्या आगमनाची ब्रह्मपुरीकर व पंचक्रोशितील भक्तगत दरवर्षी वाट पाहात असतात. कारण ब्रह्मपुरीच तुझ्या उत्सवाने सर्वदूर परिचित झाली आहे. गणपती उत्सव म्हणजेच खऱ्या अर्थाने ब्रह्मपुरीकरांचा उत्सव असल्याचे दरवर्षी वाटत आले आहे. पण एक खंत मात्र आहे आणि ती पूर्ण करण्याचे वचन यावेळी ब्रह्मपुरीकरांना द्यावयाचे आहे, तो म्हणजे ‘ ब्रह्मपुरी जिल्हा झालच पाहिजे’, यासाठी शासनाला सद्बुद्धी दे! अशी प्रार्थना तुझ्या आमनाच्या निमित्याने ब्रह्मपुरीकर करीत आहेत. ९ सप्टेंबरला धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
ब्रह्मपुरीचा एकमेव मोठा उत्सव म्हणजे गणपती जत्रा होय. वीज वितरण कंपनी, एसटी महामंडळ, तुमाने कंपनी, स्व. डॉ. दौलतराव आकरे आदींनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात करून ब्रह्मपुरीला सांस्कृतिकदृष्टया नावारुपास आणले. त्यानंतर माजी आमदार स्व. बाबासाहेब खानोरकर यांनी पुन्हा ब्रह्मपुरीत गणपती उत्सवात भर घालून खेड्यापाड्यातून बंडीबैल व ट्रॅक्टरने उत्सवात भाविक गर्दी करीत आहेत. त्यांची अखंडित परंपरा त्यांची मुलगी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा रश्मी पेशने, मुलगा तरंग व पंकज चालवत आहेत. तर दुसरीकडे पूर्ण विदर्भातील ख्यातनाम शिक्षण संस्था नावलौकिक मिळविलेल्या नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात करून ब्रह्मपुरीच्या उत्सवात पुन्हा भर टाकली आणि पुन्हा ब्रह्मपुरी उत्सवाचे नवीन पर्व सुरू झाले. या दोन्ही सार्वजनिक उत्सवासहीत शहराते पेठवार्ड, पटेलनर, धुम्मनखेडा, टिळकनगर, कुर्झा, बोेंडगाव, गांधीनगर, हनुमाननगर, देलनवाडी आदी भागात गणपती उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासोबतच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सवालादेखील मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे. याबरोबरच घरगुती गणेश उत्सवालाही मोठ्या प्रमाणात उत्सवाची तयारी दिसून येत आहे.
कुंभर बांधवाकडे मूर्तीच्या आगमनाकडे रिघ लागल्याचे दिसून येत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर यावर्षी ब्रह्मपुरी जिल्ह्याचा प्रश्न सातत्याने सर्वासमोर उभा आहे. सन १९९२ पासूनची मागणी आहे. राष्ट्रसंत गिताचार्य तुकडोजी महाराज यांच्या पावनस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. अड्याळ टेकडी हे पवित्र स्थान ब्रह्मपुरीच्या संस्कृतीचा मानबंदू आहे. गीताचार्य स्व. तुकाराम दादा यांचे हजारो अनुयायी तालुक्यात शांतीचा व अहिंसेचा प्रचार व प्रसार करीत आहेत. तरीही शासनदरबारी ब्रह्मपुरी जिल्ह्याची नोंद का केली जात नाही, हे गणराया तूच समजून घेण्याची वेळ आली आहे. गणराया तुझ्या आगमनात व विसर्जनात कुठलीही कसर ब्रह्मपुरीकरांनी ठेवली नाही. तुझ्यावर जिवापाड प्रेम केलेले पुरुष, महिला व युवक आणि बाल नतमस्तक होत आहे. पण आता मात्र या सर्वांना तुझ्या कडून मोठी आशा आहे. तूच आपल्या वक्रतूंड, महाकाय, सुर्यकोटी वरहस्ताने आमच्या ब्रह्मपुरी जिल्हा बनविण्यासाठी शासनाला सद्बुद्धी दे ! व आमच्या गेल्या ३५ वर्षांपासून होत असलेला अन्याय दूर कर, हीच या ब्रह्मपुरीमधील विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सर्वांची मनोमनी मागणी आहे. याबरोबरच माझ्या शेतकऱ्याला बळ दे ! त्याच्या शेतात पावसाच्या धारा व धानाचा मोती चमूक दे, हीसुद्धा समस्त बळीराजांची अपेक्षा! (तालुका प्रतिनिधी)

Web Title: O Ganaraya, give goodwill to the Brahmapuri district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.