कुपोषण रोखण्यासाठी पोषणदूत ठरताहेत जीवनदूत
By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:42+5:302016-01-02T08:34:42+5:30
कुपोषण मातांचे असो की बाळांचे, तो आपल्या समाजाला लागलेला एक डाग आहे. म्हणूनच गावात कुपोषण

कुपोषण रोखण्यासाठी पोषणदूत ठरताहेत जीवनदूत
टेमुर्डा : कुपोषण मातांचे असो की बाळांचे, तो आपल्या समाजाला लागलेला एक डाग आहे. म्हणूनच गावात कुपोषण संपविण्यासाठी माता व बाल कुपोषण निर्मूलन समिती, येन्साचे सदस्य (पोषणदुत) घरोघरी भेटी देऊन समाजप्रबोधनाद्वारे कुपोषणमुक्त गावाची संकल्पना साकारत आहेत.
डॉ. किशोर भट्टाचार्य यांनी कुपोषणमुक्त समाजासाठी गावागावामध्ये कुपोषण निर्मूलन समितीची स्थापना करुन गावकऱ्यांना प्रशिक्षित केले व प्रत्येक घरात गावकऱ्यांमार्फत कुपोषणमुक्त समाजासाठी प्रबोधनाची सुरुवात केली. त्याचा प्रभाव आता गावागगावात दिसून येत आहे.
माता व बाल कुपोषण निर्मूलन समिती, येन्सा येथील सर्व सदस्य दर शनिवारी गावात गरोदर माता, स्तनदा माता तसेच कुपोषित बालकांच्या घरी भेटी देऊन कुटुंब सभा आयोजित करतात. या कुटुंब सभेमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची उपस्थिती असते. माता व बालकाचे योग्य पोषण कसे करावे, यावर समिती कुटुंबाला मार्गदर्शन करीत असल्याने कुपोषण रोखण्यावर यश येत आहे. (वार्ताहर)