१० दिवसांपासून पोषण आहार ठप्प
By Admin | Updated: August 21, 2016 02:50 IST2016-08-21T02:50:57+5:302016-08-21T02:50:57+5:30
नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला पोषण आहाराचे साहित्य उपलब्ध करण्यात आलेले नाही.

१० दिवसांपासून पोषण आहार ठप्प
चिंधीचक : नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला पोषण आहाराचे साहित्य उपलब्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या १० दिवसांपासून पोषण आहार पुरवठा करण्यात आलेला नाही. पुरवठा परवानाधारकांनी साहित्य उपलब्ध केले नसल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली आहे.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत १०४ विद्यार्थी शिक्षण घेतात शासन निर्णयानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यानानंतर शाळेतच जेवन मिळत असते. परंतु गेल्या १० दिवसांपासून शालेय पोषण आहार योजनेचे तांदुळ, वटाना, मटकी, तेल, मसाला, मिरची आदी साहित्य उपलब्ध करण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थी दुपारच्या जेवनापासून वंचित आहेत. तसेच आदिवासी सुवर्ण मोहत्सवी योजनेअंतर्गत वर्षभरापासून ३० विद्यार्थ्यांची रखडली आहे. याबाबतही पालकांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे तक्रार केली.शासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करीत असले तरी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात अधिकारी गंभीर नाहीत. त्यामुळे जि.प. शिक्षणाकडे पालकाचा कल कमी होत असून खासगी शिक्षणाकडे पालक वळत आहे. (वार्ताहर)