मिस्टर इंडिया स्पर्धेत नुतन कोलावारचे सुयश

By Admin | Updated: April 6, 2017 00:38 IST2017-04-06T00:38:15+5:302017-04-06T00:38:15+5:30

येथील नुतन महेश कोलावार यांनी मिस्टर अँड मिसेस इंडिया कमेटीच्या वतीने आयोजित केलेल्या मिस्टर अँड मिसेस इंडिया या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

Nutan Kolawar Suyash in Mr. India competition | मिस्टर इंडिया स्पर्धेत नुतन कोलावारचे सुयश

मिस्टर इंडिया स्पर्धेत नुतन कोलावारचे सुयश

चंद्रपूर : येथील नुतन महेश कोलावार यांनी मिस्टर अँड मिसेस इंडिया कमेटीच्या वतीने आयोजित केलेल्या मिस्टर अँड मिसेस इंडिया या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर कोलकत्ता येथे नुकत्याच पार पडलेलया मिसेस इंडिया या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी नुतनला मि. इंडिया बेस्ट कॉन्फीटंस पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावरील ग्लॉमरस क्षेत्रात चंद्रपूरचे नाव उंचावले आहे. नुतन कोलावारला मिळालेल्या या यशाबद्दल सर्वच क्षेत्रातून तिचे कौतूक करण्यात येत आहे. नुतनने आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला दिले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Nutan Kolawar Suyash in Mr. India competition