१३ तालुक्यांत बाधितांची संख्या शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:41+5:302021-07-20T04:20:41+5:30

कोरोनाबाधित आलेल्या चार रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २, चंद्रपूर व सावली तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. बल्लारपूर, भद्रावती, ...

Number of victims in 13 talukas is zero | १३ तालुक्यांत बाधितांची संख्या शून्यावर

१३ तालुक्यांत बाधितांची संख्या शून्यावर

कोरोनाबाधित आलेल्या चार रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २, चंद्रपूर व सावली तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती येथे आज एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ९३५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार २८७ झाली आहे. सध्या ११५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख ९५ हजार २४५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ७ हजार १४९ नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत १५३३ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून बाहेर यावे आणि नियमित मास्क वापरावा, पात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

Web Title: Number of victims in 13 talukas is zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.